भोर | भोर तालुक्यात पोलीस पाटलांचा निर्घृण खून; घोरेपडळ-सांगवी बुद्रुक परिसरात खळबळ!

 


पुणे | भोर | घोरेपडळ-सांगवी बुद्रुक

भोर तालुक्यातील घोरेपडळ-सांगवी बुद्रुक येथे पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अशोक साधू येनपुरे यांचा खून नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यांच्यावर हल्ला कोणत्या परिस्थितीत करण्यात आला आणि या घटनेमागे कोणाचा हात आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. खुनामागील कारणाचा शोध घेणे, घटनेचा संपूर्ण घटनाक्रम उघड करणे आणि आरोपींना शोधून ताब्यात घेणे, हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

दरम्यान, या घटनेमुळे भोर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून आरोपींना तातडीने अटक करून घटनेमागील सत्य समोर आणावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments