गुळूंचे (ता. पुरंदर) : तीर्थक्षेत्र ग्रामपंचायत गुळूंचे येथील उपसरपंचपदी सौ. कविता शंकर निगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तानाजी निगडे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवड प्रक्रिया पार पडली.
सरपंच सौ. सम्राज्ञी निगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड प्रक्रियेत कविता शंकर निगडे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा ग्रामसेविका सोनल जगदाळे यांनी केली.
यावेळी पुरंदर तालुक्याचे माजी सभापती अजित निगडे उपस्थित होते. त्यांनी नवनिर्वाचित उपसरपंच कविता निगडे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे मा,उपसरपंच दीपक निगडे, मा.उपसरपंच तानाजी निगडे, ग्रामपंचायत सदस्या वैशाली फरांदे, शितल कर्णवर, अमृता निगडे, माऊली पाटोळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच गावातील ग्रामस्थ आणि आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित उपसरपंचांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक निगडे यांनी केले.

0 Comments