बारामती |

 संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अध्यक्षपदाच्या निवडीवर अखेर शिक्कामोर्तब; संचालक मंडळाचा एकमताने निर्णय

सोमेश्वरनगर | श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवड अखेर आज पार पडली. या निवडीकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी ——-१ यांच्या नावावर सर्व संचालकांनी एकमताने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आता —— यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदार पार्थ पवार आणि युवा नेते जय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी जय पवार यांची विशेष उपस्थिती होती.

कारखान्याच्या २१ जागांच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता अध्यक्षपदाची धुरा ——- यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. आगामी काळात कारखान्याची प्रगती, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित आणि सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी नवनियुक्त अध्यक्षांवर असणार आहे.

या निवडीमुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, परिसरातील शेतकरी सभासद आणि कार्यकर्त्यांकडून—- यांचे अभिनंदन केले जात आहे.


Post a Comment

0 Comments