पुरंदर रिपोर्टर-Live
निरा (ता. पुरंदर): विजय लकडे
शिवशक्ती व्यायाम मंडळ व काका पाटील ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि करिअर मार्गदर्शन शिबिर महात्मा गांधी विद्यालय, निरा येथे दिनांक १८ मे २०२५ रोजी अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात अॅड. पृथ्वीराज (काका) चव्हाण यांच्या प्रास्ताविकाने झाली. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या विशेष कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक हेमचंद्र शिंदे सर यांचे मार्गदर्शन होते. त्यांनी विद्यार्थ्यांना १० वी व १२ वी नंतरच्या करिअरच्या असंख्य संधींविषयी सखोल व स्पष्ट माहिती दिली. “स्वप्न मोठी ठेवा आणि सातत्याने प्रयत्न करा” असा सल्ला देत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. कोणतीही शंका वा अडचण असल्यास थेट संपर्क करण्याचेही आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. दत्ताजी चव्हाण होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी “१० वी, १२ वी नंतर काय?” या प्रश्नाचे योग्य मार्गदर्शन मिळवणे हाच या शिबिराचा उद्देश असल्याचे सांगितले. गुणांसोबतच योग्य दिशा, मार्गदर्शन आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात मुख्याध्यापक धुमाळ सर, नाईकवाडे मॅडम, राजेश चव्हाण, बाळासाहेब ननावरे, सुनील चव्हाण, मनोज शहा, मुन्ना डांगे, सागर बागडे, किरण बोधे, संतोष गांधी, संभाजी गायकवाड,राहुल मोरे, सुभाष जेधे, बाबुराव पाटोळे, विलास धायगुडे, प्रविण भोईटे, अजित सोनवणे, सुरेंद्र जेधे, राहुल शिंदे, कुमार मोरे, बाळासाहेब मोहिते, प्रशांत बिचकले, महेश धायगुडे, लक्ष्मण चव्हाण,निखिल लकडे, स्वप्निल कांबळे, रोहण थोपटे, दीपक जाधव, अमित लाहोटी, संजय शहा, सनी सुर्यवंशी, विकी अगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते. अनेक पालकांच्या शंकांचे समाधान करण्यात आले. सत्कार सोहळा, प्रभावी मार्गदर्शन आणि प्रेरणादायी वातावरणामुळे उपस्थितांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व प्रभावीरीत्या पार पडले. संयोजनासाठी अॅड. पृथ्वीराज चव्हाण यांचे विशेष योगदान लाभले. सूत्रसंचालन आदित्य काळे व कपिल कामतकर यांनी केले कार्यक्रमाचे आभार जगदीश घुले सर यांनी केले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच मैलाचा दगड ठरेल असे प्रतीपादन अनेकांनी केले
0 Comments