दौंड, (पुणे) :
पुणे-सोलापूर महामार्गावर मळद (ता. दौंड ) ग्रामपंचायत हद्दीत दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी (ता. 14) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या रेल्वे पुलाचे उड्डाणपुलावरील उतारावर हि घटना घडली आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता. 30) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाधान नाथा वाघमारे (वय 27, रा. मोहोळ, ता. मोहोळ, जि. सोलापुर सध्या रा. कासुर्डी (खे.बा.) ता. भोर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गणेश चंद्रकांत देवकुळे (वय 33, रा. म्हैसगाव ता. माढा जि. सोलापुर, सध्या रा. खेड शिवापुर ता. पुरंदर) असे अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान वाघमारे व गणेश देवकुळे हे दोघेही मित्र आहेत. पुणे - सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने निघाले होते. मंगळवारी सकाळी मळद (ता.दौंड ) ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे पुलाचे उड्डाणपुलावरील उतारावर आले असता वाघमारे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी घसरली आणि अपघात झाला. या अपघातात गणेश देवकुळे यांच्या हाताला, पायाला तसेच तोंडाला दुखापत झाली. तर समाधान वाघमारे याच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, याप्रकरणी गणेश देवकुळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार समाधान वाघमारे याच्यावर स्वतःचे मृत्युस तसेच मोटार सायकलचे नुकसानीस कारणीभुत झाल्याप्रकरणी भा.न्याय. संहिता. कलम 106(1), 281, 125 (A), 125 (B), 324 (4) मो.वा.का. कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भागवत करीत आहेत.
0 Comments