पुरंदर रिपोर्टर live
राजगुरुनगर-प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील अपरिचित आणि अति दुर्गम असणारे दुर्ग कोळकेवाडी आणि बारवाई या गडांना भेट देत टीम पॉइंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करीत वंदन केले. यावेळी ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या भारतीय संरक्षण दलास सलाम करण्यात आला.
या मोहिमेची सुरवात कोळकेवाडी, ता.खेड, जि.रत्नागिरी येथुन सकाळी सहा वाजता "धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय" या घोषणेने झाली. तब्बल तीन तासांची पायपीट करून गड माथा गाठण्यात आला. या वेळी निसरड्या अवघड पायवाटेने जात गडावरील गुहा आणि पाण्याच्या टाक्यांना भेट देण्यात आली. गड उतार होण्यास सुमारे तीन तास लागले.
त्यानंतर खडपोली धनगरवाडी, ता.चिपळूण, जि.रत्नागिरी येथुन दुर्ग बारवाई साठी पायपीट सुरू करण्यात आली. सुमारे एक तासांची पायपीट करून गड माथा गाठण्यात आला. गडावरील असणाऱ्या सर्व वास्तुंना भेट दिल्यावर शंभू राजेंना वंदन करण्यात आले. या नंतर गड उतार होऊन मोहिमेची सांगता करण्यात आली.
रखरखत्या उन्हात तब्बल वीस किलोमीटरची पायपीट, दुर्ग कोळकेवाडी वरील चुकीला माफी नसणाऱ्या गुहा आणि पाण्याच्या टाक्यांना जाणाऱ्या निसरड्या अवघड वाटा, पाण्याची कमतरता, अति दुर्गम भागातील भटकंती अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉइंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या जॅकी साळुंके, अमृत भावसार, गणेश बागुले, भरत पिंगळे, अमोल पन्हाळकर, हिमांशु पाटील, राजेंद्र साळुंके, बाबासाहेब तावरे, रामचंद्र कर्णे, महेश पाटील, सारंग गोंधळेकर, अथर्व पाटील, डॉ.प्रतिभा शिंदे, मानसी वैद्य, डॉ.धनश्री पाटील आणि डॉ.समीर भिसे यांनी भटकंती सुरक्षितपणे पुर्ण केली.
0 Comments