वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई : फरार आरोपी निलेश चव्हाण नेपाळमध्ये अटकेत!

                        पुरंदर रिपोर्टर livE

पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी आणखी एक मोठा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या प्रकरणात गुन्हेगारी कटात सामील असलेला आणि गेल्या आठवड्याभरापासून फरार असलेला आरोपी निलेश चव्हाण याला नेपाळमध्ये अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सहा पथकांनी त्याचा शोध घेत त्याला अखेर बेड्या ठोकल्या आहेत.


पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबीयांना धमकावणे, मानसिक त्रास देणे आणि गुन्हेगारी कटात भाग घेणे, या गंभीर आरोपांखाली निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो गेल्या आठवड्यापासून फरार होता आणि दुसऱ्या राज्यात लपल्याचा संशय होता. परंतु, तो थेट नेपाळमध्ये असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तात्काळ त्याला अटक करण्यात आली.


लवकरच पुण्यात आणले जाणार

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश चव्हाणला लवकरच पुण्यात आणून पिंपरी-चिंचवड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून निलेश चव्हाण हा सहावा आरोपी ठरतो.


वडिलांचा गंभीर आरोप….

दरम्यान, वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीच्या विरोधात रचलेल्या कटात निलेश चव्हाणदेखील सक्रिय सहभागी असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांच्या वक्तव्यानंतर पोलिसांनी तपास अधिक गतिमान केला आणि निलेशच्या हालचालींवर लक्ष ठेवून नेपाळमध्ये त्याला अटक केली.


Post a Comment

0 Comments