पुरंदर रिपोर्टर Live
निरा — विजय लकडे.
दहावी व बारावीच्या शिक्षणानंतर पुढील शैक्षणिक वाटचाल कशी असावी, कोणत्या क्षेत्रात करिअर करावे, याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये अनेक शंका असतात. या अनुषंगाने योग्य दिशादर्शन मिळाल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य निश्चितच उजळू शकते. अशाच उद्देशाने शिवशक्ती व्यायाम मंडळ निरा व काका पाटील ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी विद्यालय, निरा येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
“दहावी-बारावीनंतर पुढे काय?” तसेच “करिअर विषयी बोलू काही” या विषयावर आधारित हा मेळावा असून याबाबत अधिक माहिती आयोजक अँड. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
या कार्यक्रमात सेंटर ऑफ करिअर गाईडन्सचे अध्यक्ष हेमचंद्र शिंदे हे विद्यार्थ्यांना आणि पालकांना शैक्षणिक व करिअर मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या २३ वर्षांपासून शिक्षण प्रवेश प्रक्रियेत सक्रिय असलेल्या शिंदे यांचे अनुभवातून मिळणारे मार्गदर्शन हे उपयुक्त ठरणार असून, विद्यार्थ्यांसाठी निश्चितच मोलाचे ठरेल.या प्रसंगी दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती दत्ताजी चव्हाण असणार आहेत.
शिवशक्ती व्यायाम मंडळ निरा व काका पाटील ज्ञानपीठ यांच्यावतीने निरा व परिसरातील सर्व विद्यार्थी व पालकांना या उपयुक्त कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments