इंदापूर बसस्थानकात बस मध्ये बसन्याच्या जागेवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; ११ जणांवर गुन्हा दाखल

पुरंदर रिपोर्टर Live 

इंदापूर:प्रतिनिधी 

इंदापूर (पुणे) : इंदापूर येथील एस.टी. बसस्थानकात बसमध्ये बसण्याच्या जागेवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत ११ जणांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींपैकी ७ महिला आहेत.


गुरुवारी (ता. २२ मे) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास अकलूज-पुणे एस.टी. बस इंदापूर बसस्थानकावर आली. बसमध्ये प्रवेश आणि बसण्याच्या जागेच्या वादावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं. इंदापूर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद आटोक्यात आणला.


या प्रकरणी पोलीस हवालदार सचिन सोपान बोंबे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १९४(२) अंतर्गत सामाजिक शांतता बिघडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अजय रमेशचंद्र तिवारी (३१, गोरेगाव वेस्ट, मुंबई), वैभव ललीत गोरे (२७, आरे कॉलनी, गोरेगाव, मुंबई), विक्की सुबोध सिंग (२२, टाटा जमशेदपूर, झारखंड), प्रिया दीपक सोळंकी (२०, नायगाव, मुंबई), रिपल रत्नाकर त्रिपाठी (१९, कल्याण, ठाणे), प्राजक्ता दिनानाथ कहार (२४, वसई, पालघर), पिंकी प्रेम सिंग (१९, विरार, पालघर), जोहा समीर शेख (१९, कल्याण, ठाणे), कशीश प्रकाश महाजन (२०, कल्याण, ठाणे), आकाश हनुमंत शिंदे (२५, बिजवडी, इंदापूर) आणि आरती आकाश शिंदे (२२, बिजवडी, इंदापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या प्रकरणाचा तपास सुरू असून, वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.


या घटनेमुळे बसस्थानकातील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.


Post a Comment

0 Comments