पुणे | ३० मे २०२५
पुण्यातील चाकण परिसरात भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दुचाकीस्वार दोन तरुणांना चिरडल्याची हृदयद्रावक घटना घडली. वासुलीफाटा रोडवरील बिरदवाडी येथे ओव्हरटेक करताना ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली, त्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांची नावे सुजय कडूसकर आणि सोहम कडूसकर अशी असून, या दोघेही एकाच दुचाकीवरून जात होते. ट्रकच्या धडकेत दोघेही चाकाखाली आले आणि तब्बल १५ ते २० फूट फरफटत गेले, अशी माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली.
अपघाताच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. काही क्षणातच घटनास्थळी गर्दी झाली. नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरु केले.
चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.
पावसाळ्याची सुरुवात होताच रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनधारकांनी काळजीपूर्वक आणि वेग मर्यादेत वाहन चालवण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0 Comments