पुरंदर रिपोर्टर Live
लोणंद. सुशील गायकवाड.
धर्मनिरपेक्षता,स्वातंत्र्य,बंधुता,समता व न्याय या तत्त्वांप्रमाणे राज्यकारभार करणाऱ्या, लोककल्याणकारी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती निरगुडी ता.फलटण येथे व ग्रामपंचायत या ठिकाणी साजरी करण्यात आली.
प्रथमतः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यांनतर माजी सरपंच राजेंद्र सस्ते, ग्रामपंचायत अधिकारी नारायण कदम,सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे, सचिन सस्ते, सुनिता सस्ते यांनी राजमाता आहील्यादेवी होळकर यांच्या कार्या विषयी माहिती सांगितली.यावेळी महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सौ.कविता जावडकर व जिल्हा परिषद शिक्षिका सुनिता सस्ते यांना अहिल्यादेवी होळकर आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी उपस्थित सरपंच कोमल सस्ते,उपसरपंच सारिका बनसोडे,माजी.सरपंच राजेंद्र सस्ते,ग्रामपंचायत अधिकारी नारायण कदम,ग्रामपंचायत सदस्य सत्यजित सस्ते,वामन जाधव,युवा नेते राजेंद्र लकडे,धनंजय लकडे,दिपक सस्ते, सचिन सस्ते,प्रदीप खुडे,निलेश गोरे,तुकाराम आवटे,वैभव लोंढे,सचिन खोमणे,महावीर बनसोडे,चांगदेव लकडे,शिवाजी लकडे, नाना सो लकडे,किरण लकडे,पै.पवन लकडे, प्रवीण सस्ते,अहिल्यादेवी होळकर जयंती मंडळाचे अध्यक्ष नवनाथ लकडे,जय कोलवडकर, सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments