पुरंदर रिपोर्टर......
निंबुत. विजय लकडे.
बारामती तालुक्यातील निंबुत गावात बुधवार, दिनांक २१ रोजी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. हे शिबिर चंद्रकांत दादा पाटील (मंत्री – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य, महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समर्थ युवा फाउंडेशन अध्यक्ष राजेश पांडे यांचा माध्यमातून या शिबिराचे आयोजन भारतीय जनता पक्षाचे युवा नेते दिग्विजय काकडे यांनी केले होते. सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबिर ग्रामपंचायत कार्यालयासमोरील परिसरात पार पडले.
या आरोग्य शिबिरात नामांकित व तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत विविध तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये रक्तातील सर्व घटकांची तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तातील साखर तपासणी, डोळ्यांची तपासणी, दातांची तपासणी तसेच महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणीसारख्या अत्यंत आवश्यक व महत्त्वपूर्ण तपासण्या करण्यात आल्या. संपूर्ण तपासण्या अत्यंत काटेकोरपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्या.
या शिबिराचे उद्घाटन निंबुत चे माजी उपसरपंच विजयराव काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या सोबत सुनिल पांडे उपाध्यक्ष भा.ज.प पुणे शहर ,दिग्विजय काकडे ,प्रकाश जगताप (उपाध्यक्ष भा.ज.प.) बारामती तालुका ,मा.उपसरपंच उदय काकडे, ग्रा.सदस्य कुमुदिनी काकडे, नंदकुमार काकडे, अनिल काकडे, दत्तराज काकडे, शिरीष काकडे, ग्रामविकास अधिकारी चंद्रशेखर काळभोर, क्लार्क भाऊ कोळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ २०० हून अधिक ग्रामस्थांनी घेतला. शिबिरात वयोवृद्ध, महिला, युवक-युवती यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. गावकऱ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत यापुढेही असे उपक्रम नियमितपणे आयोजित व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.सामाजिक भान ठेवून हा उपक्रम गावात यशस्वीरित्या पार पडला.
0 Comments