विलास चव्हाण यांचे निधन


पुरंदर रिपोर्टर Live 

 निरा | विजय लकडे

निरा (ता. पुरंदर) येथील रहिवासी विलास (बापू) उर्फ धनाजी शिवाजीराव चव्हाण (वय ५८) यांचे बारामती येथे रात्री १२.३० वाजता अकस्मात दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. ते माजी सनदी अधिकारी संभाजी चव्हाण यांचे बंधू होत. तसेच पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मणराव चव्हाण व पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती दत्ताजी चव्हाण यांचे ते पुतणे होते.

 अंत्यविधी रविवार, दि. २५ मे रोजी सकाळी ११ वाजता निरा नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीत होणार आहेत.

त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Post a Comment

0 Comments