पिंपरे बुद्रुक विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सुखदेव शिंदे बिनविरोध !



पुरंदर रिपोर्टर Live. 

विजय लकडे.  

लोणंद: खंडाळा तालुक्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या पिंपरे बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी  सुखदेव साहेबराव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मावळते अध्यक्ष दत्तात्रय भुजबळ यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदाच्या निवडीसाठी बैठक घेण्यात आली.या पदासाठी  सुखदेव शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

      यावेळी संचालक धनाजीराव    अहिरेकर ,शांताराम धायगुडे ,संतोष शिंदे, मुगटराव धायगुडे ,निलेश कापसे ,संतोष चव्हाण, अंकुश ननावरे, हरिभाऊ धायगुडे, दत्तात्रय भुजबळ ,प्रमोद सोनवणे ,किरण शिंदे राजेंद्र यादव व्हाईस चेअरमन रूपाली यादव, लता जाधव उपस्थित होते.निवडणूक अधिकारी सुजाता कोरडे यांनी कामकाज पाहिले. त्यांना सचिव सयाजी शिंदे, अमोल धायगुडे ,बबन धायगुडे यांनी सहकार्य केले.

   चेअरमन सुखदेव शिंदे यांची मदत व पुनर्वसन कॅबिनेट मंत्री  मकरंद पाटील ,खासदार नितीन पाटील व ज्येष्ठ नेते मिलिंद पाटील यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments