पाच नवीन एसटी बसेसचे लोकार्पण; भोर-राजगड (वेल्हा)-मुळशी मतदारसंघातील वाहतूक सुविधा सुधारण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न!


                      पुरंदर रिपोर्टर लाइव

भोर:प्रतिनिधी 

      भोर - राजगड (वेल्हा) - मुळशी विधानसभा मतदारसंघातील एसटी बस सेवा अधिक सोयीची व्हावी, ग्रामीण भागातील जनतेला एसटीच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी सुरुवातीस माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नामुळे व नंतर विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने भोरला पाच नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


सदर बसेसचा लोकार्पण उद्घाटन सोहळा आज शुक्रवार (दिनांक ६) सकाळी नऊ वाजता माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते व नंतर दहा वाजता विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते भोर बसस्थानकात फटाक्यांच्या आतिषबाजीत पार पडला.


उद्घाटन सोहळ्यात आगार प्रमुख रमेश मंथा, प्रदिप इंगवले, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, चंद्रकांत बाठे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, केदार देशपांडे, अतुल काकडे, कुणाल धुमाळ, प्रा गायकवाडसर, भोलावडेचे सरपंच प्रवीण जगदाळे, प्रशांत पडवळ, भाजपाचे पल्लवी फडणीस, अमर बुदगुडे, राजेंद्र गुरव, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक खुटवड, गोपनीय पोलीस अभय बर्गे, वाहतूकचे पोलीस सुनील चव्हाण, होमगार्ड व भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (शिंदे) या तिन्ही पक्षाचे महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments