म्हणून इंद्रायणी वरील पुल कोसळला - कारण आल समोर!

 

                      पुरंदर रिपोर्टर Live

पुणे | मावळ | प्रतिनिधी

                         पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून २० ते २५ पर्यटक वाहून गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


ही घटना १५ जून, रविवार रोजी सायंकाळी साडेतीनच्या सुमारास घडली. सुट्टीचा दिवस असल्याने या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होती. पर्यटकांची संख्या आणि पुलावर चढवलेल्या दुचाक्यांमुळे पूलावर जास्त भार आला आणि पूल कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.


घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिस, अग्निशमन दल व स्थानिक बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने बचाव कार्य सुरू असून, बेपत्ता पर्यटकांचा शोध घेतला जात आहे.


या घटनेमुळे मावळ परिसरात मोठी खळबळ उडाली असून, इंद्रायणी नदीत अजूनही काही पर्यटक अडकले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पूल कोसळण्यामागील अति गर्दी आणि नियमबाह्य वर्तन याकडे आता प्रशासन लक्ष देत असून, पुढील चौकशी सुरू आहे. 

Post a Comment

0 Comments