पुरंदर रिपोर्टर लाईव्ह.
विजय लकडे.
पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे येथे एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ही घटना २८ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास हा मृतदेह आल्यावर त्यांनी पोलीस स्टेशनला तातडीने माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ वर्षे असून, त्याच्या अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि नीळसर रंगाची पॅन्ट होती. अद्याप या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.
जेजुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी API दीपक वाकचौरे आणि PSI महेश पाटील या प्रकरणाचा तपास करत असून, त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की, या वर्णनाशी जुळणाऱ्या हरवलेल्या व्यक्तीबाबत माहिती असल्यास त्यांनी खालील क्रमांकांवर तात्काळ
संपर्क साधावा.
API दीपक वाकचौरे - 8169837481
PSI महेश पाटील – 83293 93338
पोलीस प्रशासनाने सांगितले आहे की, आपली एक माहिती एखाद्या कुटुंबाला त्यांच्या हरवलेल्या नातेवाईकाचा शोध लावण्यात मदत करू शकते. त्यामुळे ही माहिती शक्य त्या सर्व माध्यमांतून प्रसारित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
0 Comments