लंकेच्या घरी गेलात का?” शरद पवारांचा मिश्कील प्रश्न ; कार्यकर्त्यांमध्ये हास्याची लाट, सत्तेचा आत्मविश्वास कायम—पुण्यात राष्ट्रवादी कांग्रेस च्या वर्धापन दिनी शरद पवारांचं जोरदार भाषण!



                        पुरंदर रिपोर्टर Live 

पुणे, 10 जून 

                  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पुण्यात वातावरण गंभीर असताना, शरद पवार यांनी मिश्कील शैलीत भाषण करत कार्यकर्त्यांच्या मनातले प्रश्न हसण्याच्या लाटेत विरवले. फुटीच्या चर्चेने खळबळ उडवलेल्या पक्षात, पवार साहेबांनी मात्र दिला आशावादाचा ठसठशीत संदेश — “सत्ता येणारच आहे!”


सभागृहात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून पवार म्हणाले,

“फुट पडलीय का? होय. कार्यकर्ते गोंधळलेत का? होय. पण हे सगळं तात्पुरतं आहे. राष्ट्रवादी अजूनही ताकदीत आहे.”


कार्यक्रमात एक मजेशीर क्षण आला, जेव्हा खासदार निलेश लंके यांचा किस्सा त्यांनी शेअर केला.

“तुम्ही कधी लंकेच्या घरी गेलाय का?” असं विचारल्यावर एका कार्यकर्त्याने हसत उत्तर दिलं –

“ते कधी घरी बोलवतच नाहीत!”

यावर सभागृहात क्षणात हास्याची लाट उसळली.

पवार म्हणाले, “लंकेचं घर एका खोलीचं आहे, पण तो माणूस रात्री दोनपर्यंत लोकांची कामं करत असतो. आता तोच तुमच्याकडे घरी येईल!”


या संवादातून त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली –

निष्ठा, संघटन आणि जनतेसाठीचं काम हेच पक्षाचं खरं भांडवल आहे.


शेवटी पवारांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला –

“ज्याचं त्याचं काम करा, कोण गेला कोण राहिला यावर नको वेळ वाया घालवू. तुम्ही काम करत राहा, सत्ता आपलीच येईल!”


पण प्रश्न अजूनही तसाच आहे –

ही “आपली” सत्ता नेमकी कोणाची? शरद पवार यांची की अजित पवार यांची?

 आज राष्ट्रवादी दोन गटांत विभागली गेली असली, तरी अनेकांच्या मते खऱ्या निष्ठा अजूनही शरद पवारांच्याच बाजूने आहेत. मात्र पुढची निवडणूकच हे ठरवेल की आशावाद पुरेसा ठरतो की नाही.


Post a Comment

0 Comments