दौंड:प्रतिनिधी
दौंड तालुक्याचे ज्येष्ठ समाजसेवक, सहकार चळवळीचे प्रणेते, कामगारांचे बुलंद आवाज आणि माजी आमदार स्व. काकासाहेब थोरात यांना त्यांच्या बहुआयामी कार्यासाठी ‘दौंड भूषण पुरस्कार २०२५’ मरणोत्तर स्वरूपात प्रदान करण्यात आला. हडपसर येथील दौंड रहिवाशी संघ यांच्या वतीने आयोजित एका सन्मान सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला. हा गौरव मा. आमदार रमेशआप्पा थोरात यांच्या हस्ते देण्यात आला.
थोर कार्याचा गौरव…
स्व. काकासाहेब थोरात यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सहकार चळवळ, कामगारांचे हक्क, ग्रामीण भागातील शिक्षण आणि समाज यासाठी अविरत कार्य केलं. त्यांच्या या बहुमूल्य योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे अनेक सहकारी संस्था उभ्या राहिल्या, तर हजारो कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवला गेला.
Baramati | अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ते बारामती सायकल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.!👇👇👇
मान्यवरांची उपस्थिती…
या सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणांतून काकासाहेब थोरात यांचे कार्य, त्यांचा दृष्टिकोन, आणि समाजासाठी त्यांनी उभं केलेलं योगदान यांचा गौरवपूर्वक उल्लेख केला. काही वक्त्यांनी भावनिक आठवणी शेअर करत, “काकासाहेब म्हणजे चालतं बोलतं प्रेरणास्थान होतं,” असे उद्गारही काढले.
✦ समाजासाठी आदर्श व्यक्तिमत्त्व
पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी मा. सुरेश आण्णा घुले, श्री. इंद्रजीत जगदाळे, सहकार महर्षी काकासाहेब थोरात पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री. रघुनाथ सरगर, कु. अभिषेक आनंद थोरात, श्री. नितीन दोरगे, श्री. संतोष दोरगे, तसेच दौंड रहिवाशी संघाचे अध्यक्ष मा. महेंद्र जगताप, सचिव जी. के. थोरात सर, सदस्य संजय जाधव आणि दादासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
Baramati | लक्ष्मण हाकेंचा बारामती मधून शरद पवारांवर गंभीर आरोप …!👇👇
काकासाहेब थोरात यांनी समाजसेवेचा वसा घेत अनेक वर्षे सहकारी संस्था, पतसंस्था, शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला. त्यांचे कार्य केवळ दौंडपुरते मर्यादित नव्हते, तर त्याचा प्रभाव संपूर्ण पुणे जिल्ह्यावर होता.
आज त्यांच्या जाण्यानंतरही त्यांचा वारसा पुढे नेण्याचं काम त्यांचे कुटुंबीय आणि अनुयायी करत आहेत. ‘दौंड भूषण पुरस्कार २०२५’ हा त्यांच्यावरील प्रेमाचा आणि त्यांच्या योगदानाची अधिकृत कबुली देणारा सामाजिक सलाम आहे.
0 Comments