पुरंदर : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यात काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा मोठा राजकीय झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संग्राम थोपटे आणि रवींद्र धंगेकर यांनी अनुक्रमे भाजप आणि शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता पुरंदरचे माजी आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप हेही भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पुरंदरमधील तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार?
संजय जगताप यांचा पुरंदर तालुक्यात विशेष प्रभाव आहे. त्यांच्या कुटुंबाची स्थानिक राजकारणात ठसठशीत उपस्थिती असून, भाजपमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे पुरंदरमधील सत्तासमीकरणे पूर्णतः बदलण्याची शक्यता आहे. विशेषतः शिवसेना नेते विजय शिवतारे यांना थेट आव्हान देणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. त्यामुळे भाजपमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये नवे राजकीय चित्र उभे राहू शकते
काँग्रेसचे वर्चस्व ढासळतेय का ??
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात पक्षाचे वर्चस्व सध्या खिळखिळं होताना दिसत आहे, थोपटे आणि दंगे करांच्या नंतर आता संजय जगताप यांचाही भाजपकडे ओढा दिसू लागल्याने काँग्रेसमध्ये अंतर्गत चिंतेचे वातावरण दिसून येत आहे
अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष….!
भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर वडणेकर यांनी संजय जगताप यांच्या पक्षप्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे..!
आता संजय जगताप यांची अधिकृत भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या निर्णयामुळे पुण्यातील राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
0 Comments