पुरंदर रिपोर्टर Live
निरा (ता. पुरंदर) | प्रतिनिधी
समाजसेवा आणि कायद्याची उकल या दोन क्षेत्रात आपल्या कार्यातून ठसा उमटवणारे निरा-शिवतक्रार गावचे सुपुत्र अॅड. आदेश गिरमे यांची महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनच्या पुरंदर तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याने गावात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे.
अॅड. गिरमे हे गेल्या ३ दशकांपासून बारामती व सासवड न्यायालयात यशस्वी वकिली करत आहेत. १९९६ मध्ये पुणे जिल्हा वकील संघटनेत तर दोन वेळा बारामती बार असोसिएशनचे खजिनदार म्हणून बिनविरोध निवडून येणे, ही त्यांच्या कारकिर्दीची ठळक वैशिष्ट्ये. २००८ साली भारत सरकारतर्फे त्यांची नोटरी म्हणून अधिकृत नियुक्ती झाली आणि त्यानंतर ते न्यायाची सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने काम करत आहेत.
Devendr Fadanvis | विधान भवन परिसरात हाणामारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणावर संतापले…??
👇👇👇👇
विशेष बाब म्हणजे अॅड. गिरमे हे गेल्या ११ वर्षांपासून समाजातील अनाथ, अपंग, माजी सैनिक, गरीब व वंचित घटकांना कोणतीही फी न घेता सेवा देत आहेत. त्यांच्याकडे आलेल्या अडचणींच्या बाबतीत ते केवळ कायदेशीर सहाय्य देत नाहीत, तर त्या प्रत्येक नागरिकाच्या वेळेची व गरजेची जाणीव ठेवून तत्पर सेवा पुरवतात.
कर्नलवाडी आणि जगताप वस्ती येथील विहिरींच्या करार विनामूल्य करणे, पहाटे मुंबईला निघालेल्या उमेदवाराला तातडीने ट्रू कॉपी मिळवून देणे, अशा अनेक सामाजिक कृती त्यांच्या सेवाभावाची साक्ष देतात.
Purandar | तुमच्या पक्ष प्रवेशाला कुठेही तडा जाऊ देणार नाही- भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण.👇👇
“न्याय सर्वांसाठी – नि:स्वार्थ सेवा हीच खरी वकिली” या भूमिकेवर ठाम राहून त्यांनी समाजसेवेसोबत कायद्याच्या व्यासपीठावरही एक आदर्श निर्माण केला आहे. गावातच राहून ग्रामीण भागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्याची त्यांची तळमळ ही त्यांच्या कार्यातील खरी ओळख ठरली आहे.
0 Comments