Crime : तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात अजून दोन आरोपींचा समावेश; मुख्य आरोपी सुजित जाधव अद्याप फरार…!

                    पुरंदर रिपोर्टर Live


सोमेश्वरनगर | प्रतिनिधी


घटनेची पार्श्वभूमी…


                तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी एकटी रस्त्याने चालत असताना आरोपी सुजित जाधव (रा. रामनगर) याने तिचा पाठलाग करून जबरदस्तीने काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत ओढले. त्यानंतर गाडीच्या काळ्या काचांच्या आड तिच्यावर अत्याचार केला. इतकेच नव्हे, तर त्यानंतर तो स्वत:ला पोलीस असल्याची बतावणी करून खोटे ओळखपत्र दाखवले आणि “जर तू ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुझ्या आई-वडिलांना जिवंत ठेवणार नाही,” अशी गंभीर धमकीही दिली.


                              घटनेनंतर आरोपी सुजित जाधव सध्या फरार असून, त्याचा भाऊ अजित जाधव देखील गेल्या वर्षभरापासून तब्बल १६ ते १७ गुन्ह्यांमध्ये फरार आहे. पोलीस या दोघांचा कसून शोध घेत आहेत.


आरोपीची स्कॉर्पिओ गाडी व संशयित कृती


                       याच काळ्या स्कॉर्पिओ गाडीचा वापर करून आरोपीने सोमेश्वर परिसरातील महाविद्यालय परिसरात मुलींशी छेडछाड केल्याची, तसेच त्यांचा पाठलाग करून त्रास दिल्याची तक्रारीही समोर आल्या आहेत. आरोपी सुजित जाधव हा रात्री बेरात्री बाहेर फिरून “गोरक्षक” या नावाखाली हप्ते वसूल करतो, अशी जोरदार चर्चा देखील सोमेश्वर परिसरात सुरु आहे.


गुन्हा दाखल …

या प्रकरणात आरोपी सुजित जाधव व गणेश गायकवाड यांच्याविरुद्ध POSCO (बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा) तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पीडितेची स्थिती आणि पोलिसांचे आश्वासन…..

सुजित व अजित जाधव यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता पीडित मुलगी व तिचे कुटुंब भयभीत आहेत. मात्र पोलिसांनी या कुटुंबीयांना पूर्णपणे संरक्षण देण्यात येईल आणि कायद्यानुसार योग्य न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही दिली आहे.


या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात तीव्र संतापाचं वातावरण आहे. आरोपींच्या लवकरात लवकर अटकेची मागणी नागरिकांकडून होत आहे.



Post a Comment

0 Comments