खळबळजनक..! अजित पवारांच्या कार्यकर्त्यावर करणी करण्याचा प्रयत्न; घटना सीसीटीव्हीत कैद, ..पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

 


पुणे: प्रतिनिधी 

              स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असतानाच मावळ तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुहास बळीराम गरुड यांच्यावर करणी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली असून, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी त्यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे.


                          रात्रीच्या अंधारात लिंबू-हळद-कुंकूचा वापर मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा, सुहास गरुड यांच्या घराबाहेरील गेटवरून एका अज्ञात महिलेने हळद-कुंकू लावलेले लिंबू आणि इतर वस्तू गेटच्या आत फेकून दिल्या. यानंतर ती महिला घटनास्थळावरून पळून गेली. संपूर्ण घटना त्यांच्या घराबाहेरील सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाली आहे.


बोरीचा बार 👇👇



जुना वाद आणि राजकीय सूड?

सुहास गरुड हे समाजाच्या इनाम वर्ग 6 ब प्रकारातील काही जुन्या मालमत्तेच्या प्रकरणांमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी काही बंद झालेल्या केसेस पुन्हा उघडल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच ही घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.


तळेगाव पोलिसांकडे तक्रार

या घटनेबाबत सुहास गरुड यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तसेच, जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून संबंधित महिलेला अटक करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.



Post a Comment

0 Comments