सायली ऍग्रो पॅरेंट फार्मचा उद्घाटन सोहळा थाटात पार, संग्राम सोरटे यांचं कुक्कुटपालनातील नवकल्पनांकडे भक्कम पाऊल..!

                        पुरंदर रिपोर्टर Live 

सोमेश्वरनगर | विजय लकड़े!

                      मगरवाडी (ता. बारामती) येथे उद्योग क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे संग्राम सोरटे यांनी ‘सायली ऍग्रो पॅरेंट फार्म’ या अत्याधुनिक कोंबडी पालन प्रकल्पाचा शुभारंभ केला. या उपक्रमातून ग्रामीण भागात कुक्कुटपालन व्यवसायाला आधुनिक रूप देण्याची आणि स्थानिक पातळीवर रोजगार संधी वाढवण्याची दिशा त्यांनी स्पष्ट केली आहे.


या फार्मचे उद्घाटन ए. व्ही. बॉयलर नाशिकचे चेअरमन श्रीकृष्ण गांगुर्डे, इंद्रजीत कोठडीया, विजयकुमार सोरटे आणि भगवानराव खारतोडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नवनाथ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी सोरटे, देवेंद्र सोरटे, माजी सरपंच अजित सोरटे, आत्माराम सोरटे, तानाजी अण्णा सोरटे, प्रवीण सोरटे, जालिंदर सोरटे, दत्ता माळशिकरे श्रीपाद सोरटे तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


फार्मची वैशिष्ट्ये काय?

सायली ऍग्रो पॅरेंट फार्म हा कोंबडी पॅरेंट फार्म असून, येथे उच्च दर्जाच्या कोंबड्या आणि कोंबड्यांचा संगोपन केला जातो. या पक्ष्यांकडून मिळणाऱ्या फर्टाइल अंड्यांमधून चांगल्या प्रतीची चिक्स (पिल्ले) तयार केली जातात. ही पिल्ले पुढे ब्रॉयलर (मांसासाठी) किंवा लेयर (अंड्यांसाठी) वापरली जातात. संपूर्ण कुक्कुट उद्योगाचा पाया असलेल्या या टप्प्याचा व्यावसायिक आणि शाश्वत दृष्टिकोन सायली ऍग्रो फार्मने स्पष्ट केला आहे.



प्रकल्पाचे मुख्य आकर्षण म्हणजे:

•उच्च प्रतीच्या पॅरेंट स्टॉक पक्ष्यांचा समावेश

•तापमान नियंत्रण, स्वच्छता व आरोग्य व्यवस्थापनात आधुनिक सुविधा

•स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती व प्रशिक्षण केंद्र

•संतुलित व सेंद्रिय आहारावर भर

•भविष्यात स्वतःची हॅचरी व ब्रॉयलर युनिट उभारण्याची योजना


शाश्वततेकडे वाटचाल…

संग्राम सोरटे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला हा प्रकल्प केवळ व्यवसायिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी आणि शाश्वत विकासाची दिशा देणारा आहे. स्थानिक तरुणांना प्रशिक्षण, मार्गदर्शन व रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून, नवनाथ उद्योग समूहाच्या विविध उपक्रमांमध्ये या फार्ममुळे आणखी एक मोलाची भर पडली आहे.


कोंबडी पॅरेंट फार्म म्हणजे ?? 

            चांगल्या दर्जाचे कोंबडी व कोंबडे पाळून त्यांच्यापासून फर्टाइल अंडी मिळवण्याचा व्यवसाय. या अंड्यांपासून तयार होणाऱ्या पिल्लांचा पुढे अंडी किंवा मांस उत्पादनासाठी वापर होतो.


सायली ऍग्रो पॅरेंट फार्म हा ग्रामीण भागातील शेतीपूरक व आधुनिक उद्योगाचा उत्कृष्ट नमुना ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments