पुरंदर रिपोर्टर Live
वाघोली :प्रतिनिधी
स्टार आकाश उर्फ अक्क्या बनसोडे याच्यावर वाघोली येथील उबाळेनगर भागामध्ये असणाऱ्या यु मेन्स वेअर येथे धारधार शस्त्राने तिघांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. हल्ला करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट ६ व वाघोली पोलिसांनी संयुक्तिक कारवाई करून अटक केली आहे. सदरची घटना गुरुवारी (दि. ३) रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी ज्ञानोबा जाधव (वय १८) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी आपले घर, खराडी येथे राहणाऱ्या अनिकेत दीपक वानखेडे, प्रवीण गोविंद माने व एका विधीसंघर्षित तरुणाला अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध रील स्टार अक्क्या बनसोडे हा वाघोली येथील बाईफ रोडपरिसरात वास्तव्यास असून त्याचे उबाळेनगर हिरो मोखा शोरूम समोर यु मेन्स वेअर येथे कपड्याचे दुकान आहे.
गुरुवारी रात्री तिघे अचानक दुकानात आले व आकाश बनसोडे यास शिवीगाळ करून थांब तुझा आज गेमच करतो असे म्हणून धारधार शस्त्राने पाठीमागून डोक्यावर, उजव्या भुवईवर, ओठाजवळ, पायाचे मांडीवर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वाघोली पोलीस करीत आहेत.
हल्ल्यानंतर अक्क्या बनसोडे यास तात्काळ उपचारारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या आहेत. सद्यस्थित त्याच्यावर उपचार सुरु आहे.
0 Comments