बारामती : प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या बसने धडक दिल्याने एका ५९ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांची नात गंभीर जखमी झाली आहे. राजेंद्र दिनकर भागवत (वय ५९ वर्ष रा. रा. गोखळी ता. फलटण) असे मृताचे नाव असून स्वरा भागवत असे गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. सकाळी पावणे सात वाजता बारामती निरा रस्त्यावर शारदानगर मध्ये हा अपघात झाला.
समोर आलेल्या माहितीनुसार, राजेंद्र भागवत हे फलटण मधील जेष्ठ पत्रकार होते. त्यांची नात स्वरा भागवत ही यामध्ये गंभीर जखमी झाली असून तिच्यावर बारामतीत उपचार सुरू आहेत. सकाळच्या सुमारास बारामतीकडून निरेकडे महामंडळाची बस जात होती. राजेंद्र भागवत हे आपल्या नातीला शारदानगर येथे सोडण्यासाठी दुचाकी घेऊन आले होते. त्यावेळी त्यांची दुचाकी माळेगावकडून शारदानगरकडे वळण घेत असताना समोरून आलेल्या भरधाव बसने जोरदार धडक दिली.
दरम्यान या अपघातात राजेंद्र भागवत यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने यांचा मृत्यू झाला तर त्यांची नात स्वरा ही गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तिला तातडीने बारामतीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

0 Comments