गुळूंचे : प्रतिनिधी
गुळूंचे येथील शारदा देवी निगडे वय ९० यांचं राहत्या घरी दुःखद निधन झाले.पुरंदर पंचायत समितीचे प्रथम सभापती कै. विजयसिंह निगडे यांच्या त्या पत्नी तर पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती अजित निगडे यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या पाठीमागे तीन मुली एक मुलगा सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
विद्यमान सरपंच सम्राज्ञी निगडे यांच्या त्या आजी सासू आहेत.
अंत्यविधी सायंकाळी पाच वाजता गुळूंचे येथील स्मशानभूमीत होणार आहे.

0 Comments