समर्थ ज्ञानपीठ संचलित पुरंदर पब्लिक स्कूलच्या स्वामिनीची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड : तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक

                            पुरंदर रिपोर्टर Live 

पुरंदर : जेजुरी 

                           श्री समर्थ ज्ञानपीठ संचलित पुरंदर पब्लिक स्कूल, जेजुरी ही शाळा जेजुरी पंचक्रोशीत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखली जाते. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी ही संस्था क्रीडा क्षेत्रातही नेहमीच यशाचा ठसा उमटवत असते.


याच परंपरेत, दिनांक २५ रोजी एम. एस. सो. वाघिरे हायस्कूल, सासवड येथे आयोजित तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत पुरंदर पब्लिक स्कूलमधील इयत्ता नववीची विद्यार्थिनी स्वामिनी सुधीर सातभाई हिने वयोगट १७ मध्ये प्रथम क्रमांक मिळवत एक मोठे यश संपादन केले आहे.


या स्पर्धेत एकूण १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. एकूण चार फेऱ्यांमध्ये झालेल्या या स्पर्धेत स्वामिनीने प्रत्येक फेरीत उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या या कामगिरीमुळे तिची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य हनुमंतराव सावंत, शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर भाविक, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments