सातारा -वाई : प्रतिनिधी
एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, याचदरम्यान मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिलं एक धक्कादायक पत्र मिळालं आहे. या पत्राची सध्या राज्यभरात सर्वत्र चर्चा सुरु आहे.
नेमकं प्रकरण काय?
साताऱ्यातील वाईमधील लाडक्या बहिणींनी हे पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहीत ‘देवभाऊ ओवाळणीत 1500 नको तुमच्या लाडक्या बहिणींना अवैध क्रेशर बंद करून न्याय द्या' अशी मागणी केलीय. या मागणीने सर्वांचे लक्ष वेधलं आहे.
खरं तर मागील काही दिवसांपासून वाई ते मुंबई मंत्रालयापर्यंत लॉग मार्च काढला आहे. वाई तालुक्यातील बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेला दगडी खान क्रेशर बंद करण्यात यावा या मागणीसाठी हा लोक मार्च काढण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर रक्षाबंधनच्या दिवशी लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहीत ओवाळणीत बेकायदेशीर क्रेशर बंद करण्यात यावी ही मागणी केली आहे.
रक्षाबंधनाची भेट दीड हजार रुपये नको प्रेशर बंद करा आम्हाला न्याय द्या अशी भावनिक साद यावेळी वाईतील महिलांनी केली आहे. पत्रात लाडक्या बहिणींनी लिहिले आहे की, “देवा भाऊ, ओवाळणीत दीड हजार नको, तुमच्या लाडक्या बहिणींना अवैध क्रेशर बंद करून न्याय द्या.
0 Comments