वडगाव निंबाळकर | प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर पोलिसांनी पळशी (ता. बारामती) येथील पिंगळेवस्ती परिसरात जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत सात जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत रोख रक्कम, पत्त्यांचा संच आणि चार दुचाकींसह तब्बल ६३ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई शुक्रवारी (दि.१२ सप्टेंबर) सायंकाळी साधारण ४.३० वाजता करण्यात आली. भाऊसाहेब करे यांच्या बंद पडलेल्या घराच्या आडोशाला मोकळ्या जागेत काही जण "१३ पान" नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता आरोपी जुगार खेळताना आढळून आले.
अटक करण्यात आलेल्यामध्ये –
मारुती आण्णा इजगुडे (५२), नारायण विठ्ठल करे (५२), संतोष जयसिंग गुलदगड (४०), रघुनाथ जगन्नाथ सोनवलकर (६५), अंकुश विठोबा केसकर (५०), गजानन रामा कडाळे आणि लक्ष्मण माने (पूर्ण नाव उपलब्ध नाही), सर्व रा. पळशी, ता. बारामती, जि. पुणे यांचा समावेश आहे.
जप्त मुद्देमाल:
रोख रक्कम : रु. १,०३०/-
हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (किंमत रु. २०,०००/-)
होंडा एस.एस. दुचाकी (किंमत रु. १५,०००/-)
बजाज प्लॅटीना (किंमत रु. १५,०००/-)
बजाज एक्ससीडी १२५ (किंमत रु. १२,०००/-)
पत्त्यांचा संच
एकूण किंमत : रु. ६३,०३०/-
या प्रकरणी पोलीस शिपाई विकास येटाळे यांनी फिर्याद दिली असून, गुन्हा क्रमांक २२८/२०२५ नोंदवला आहे. आरोपींवर मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस नाईक मारकड करीत आहेत.

0 Comments