पुरंदर रिपोर्टर Live
बारामती : प्रतिनिधी
कामगार नेते तुकाराम आण्णा जगताप यांचे चिरंजीव व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उद्योजक सेलचे अध्यक्ष राजेंद्र बापु जगताप यांची बारामती तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
देशाचे नेते व पक्षाचे अध्यक्ष खासदार मा. शरदचंद्र पवार साहेब, पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार मा. सुप्रिया सुळे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने ही निवड झाली.
पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांच्या हस्ते आणि पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथील महावीर भवन येथे जगताप यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
या नियुक्तीनंतर बारामती तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राजेंद्र बापु जगताप यांनी या प्रसंगी सांगितले की, “शरद पवार साहेबांचे विचार आणि मार्गदर्शन लक्षात घेऊन बारामती तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी तसेच पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे.”

0 Comments