Breaking News | शेतकऱ्याच्या शेतीवर 65 लाखांचे बनावट कर्ज ? पुरंदर चे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल


               पुरंदर रिपोर्टर Live 

शिरूर | प्रतिनिधी 

                                  गणेगाव दुमाला (ताशिरूरयेथील शेतकऱ्याने वित्तीय संस्थांमध्ये कर्जासाठी अर्ज केल्यानंतर त्याच्याशेतीवर परस्पर ६५ लाख रुपयांचे कर्ज काढल्याचा प्रकार समोर आला आहेधक्कादायक बाब म्हणजेकर्ज थकवल्याने जमिनीवर जप्तीची नोटीस थेट शेतकऱ्याला आल्याने या अपहाराचा भांडाफोड झालाआहेयाप्रकरणी माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे  यांच्यासह दहाजणांविरुद्ध शिरुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहेयामुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळउडाली आहे.


माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडेदिलीप नारायण वाल्हेकरबाळासाहेब काळेअजिंक्य अशोकटेकवडेविजया अशोक टेकवडेदिनेश श्रीकांत घोणेभूषण सुभाष गायकवाडसतीश महादेव जाधवप्रदीप दिगंबर जगतापगणेश अंकुश जगताप (सर्व रासासवडतापुरंदरजिपुणेअसे गुन्हा दाखलकरण्यात आलेल्यांची नावे आहेतयाप्रकरणी सचिन बाळासाहेब गरुड (रागणेगाव दुमाला ताशिरुरजिपुणेयांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारफिर्यादी सचिन गरुड यांनी व्यवसाय विस्तारासाठी सन 2019 मध्येसासवड येथील अजित मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी सासवड  अजित नागरी सहकारीपतसंस्थेत कर्जासाठी अर्ज केला होताया संस्थांनी त्यांची शेतीजमीन गहाण ठेवून आवश्यक कागदपत्रेघेतलीदरम्यानवेळोवेळी टाळाटाळ करत असताना दोन्ही संस्थांकडून एकूण 65 लाखांचे कर्ज मंजूरकरून जमिनीवर बोजा टाकण्यात आलामात्रमंजूर झालेले कर्ज कर्जदाराला  देता संबंधित संस्थांचेसंस्थापकसंचालक  व्यवस्थापक यांनी संगनमताने ती रक्कम स्वतःच्या खात्यात वळवून घेतले.

दरम्यानसन 2023 मध्ये कर्ज थकल्याने जमीन जप्तीची नोटीस आल्यानंतर गरुड यांनी तहसीलदारकार्यालयात चौकशी केली असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आलात्यानंतर त्यांनी न्यायालयात दादमागितलीसुनावणीदरम्यान न्यायालयाने शिरुर पोलिसांना संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचेआदेश दिलेया प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम करत आहेत

Post a Comment

0 Comments