पुणे | प्रतिनिधी
सहकार नगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त(वय ६१) जयसिंग तांबे यांनी आपल्या नपुसंक मुलाचं लग्न लावून दिल्यानंतर निर्माण झालेल्याअडचणींचा सामना करण्यासाठी आपल्या सुनेच्या बेडरूममध्ये घुसून जबरदस्तीने शारीरिक संबंधठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पती गौरव जयसिंग तांबे आणिसासू श्रद्धा जयसिंग तांबे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून सहकार नगर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, आई वडीलांची फसवणुक करुन लग्न करुनदिले. लग्नानंतर पती मुल होण्यास असमर्थ असल्याचे समोर आले. यानंतर सासरा, पती आणि सासू यांनीवारसदार मिळवण्याच्या हेतूने सुनेला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. आरोपीजयसिंग तांबे यांनी फिर्यादी एकटी असल्याचे पाहून तिच्या खोलीत घुसला आणि पदाची तसेचओळखीची भिती दाखवत स्वतःच्या सुनेकडून शारीरिक संबंधाची मागणी केली. नकार मिळाल्यावरजबरदस्ती करण्यास सुरुवात केली आणि न मान्य केल्यास मारून टाकण्याची धमकी दिली.
फिर्यादीच्या तक्रारीनंतर सहकार नगर पोलीस ठाण्यात निवृत्त पोलिस आयुक्त जयसींग तांबेयांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पती गौरव जयसिंग तांबे आणि सासू श्रद्धाजयसिंग तांबे यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपासकरत असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.


0 Comments