श्रमवीर उत्कर्ष पतसंस्थेचा ८ टक्के लाभांश जाहीर

                    पुरंदर रिपोर्टर live 


निरा-प्रतिनिधि -

                पुरंदर तालुक्यातील नीरा येथील श्रमवीर उत्कर्ष पतसंस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पड़ली . या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र काशिनाथ काकडे होते. सभेला संस्थेचे बहुसंख्य सभासद उपस्थित होते.


                या सभेत मानद सचिव धनंजय यादव यांनी चालू आर्थिक वर्षातील संस्थेच्या कामकाजाचा आढावा सादर करताना माहिती दिली की, संस्थेला यावर्षी तब्बल १६ लाख रुपयांचा नफा झाला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती देताना त्यांनी सांगितले की, या नफ्यातून सभासदांना ८ टक्के लाभांश वाटप करण्यात येणार आहे.


सभेत संस्थेच्या पारदर्शक कामकाजाचे कौतुक करण्यात आले. यावेळी उपस्थित संचालक व सभासदांनी संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. आभार प्रदर्शन संस्थेचे व्हॉइस चेअरमन श्रीकांत देव यांनी मानले.


 संस्थेची वैशिष्ट्ये (सभासदांसाठी उपलब्ध योजना)-

•      मॉरगेज कर्ज – १५%

सोनेतारण कर्ज – १३%

मुदत ठेव व्याज – ११%


सभेत चर्चेदरम्यान असे स्पष्ट करण्यात आले की, संस्थेने गेल्या २८ वर्षांत विश्वास, पारदर्शकता आणि सभासदांना केंद्रस्थानी ठेवून काम केल्यामुळे आज पतसंस्थेने चांगली प्रगती साधली आहे. नीरा व परिसरातील शेकडो सभासदांना या योजनांचा लाभ मिळत असून, संस्थेच्या माध्यमातून स्थानिकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होत आहे.          

Post a Comment

0 Comments