सोरटेवाडीमध्ये राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती जल्लोषात साजरी..

 

                         

                        पुरंदर रिपोर्टर Live 

 सोमेश्वरनगर |  प्रतिनिधी

                              आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान, सोरटेवाडी यांच्या वतीने राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली.


कार्यक्रमाची सुरुवात युवकांनी जेजुरी ते सोरटेवाडी पायी मशाल ज्योत आणून झाली. गावातील महिलांनी औक्षण करून मशालीचे स्वागत केले. त्यानंतर सोमेश्वर  कारखाना संचालक व नवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष संग्राम सोरटे यांच्या हस्ते स्वागत सोहळा पार पडला.



यानंतर जय मल्हार क्रांती संघटना, पुणे जिल्हा अध्यक्ष पै. नानासाहेब मदने यांच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिमेची मिरवणूक करंजेपूल ते सोरटेवाडी मार्गावरून ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीसह व भंडाऱ्यांच्या उधळणीत काढण्यात आली. "राजे उमाजी नाईकांचा विजय असो", "येळकोट येळकोट जय मल्हार" अशा घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेला.



कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य श्रीपाल सोरटे, महेंद्र शेंडकर, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन शेवाळे, उद्योजक गणेश कर्चे, सुशांत सोरटे, राज्य सदस्य छगन आण्णा जाधव, राज्य सरचिटणीस महेश जाधव, जादूगार शिवम, राज्य युवक खजिनदार रविंद्र जाधव, तालुका सचिव अनिल मदने, आप्पा भंडलकर, व्यसनमुक्ती तालुका अध्यक्ष चांगदेव भंडलकर, उमेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

या जयंती उत्सवात मंडळाचे ज्येष्ठ वर्ग, युवक तसेच महिलाभगिनींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण समिती बारामती तालुका अध्यक्ष विजय शिरतोडे, पुणे जिल्हा महिला संघटक उर्मिला मदने, खजिनदार नरेश खोमणे, कुमार भंडलकर, अमोल भंडलकर, अमोल जाधव, मयुर शिरतोडे, अशितोष शिरतोडे, दिलीप भंडलकर, अनिल जाधव, सारिका शिरतोडे, अर्चना भंडलकर, रुपाली शिरतोडे, अलका चव्हाण, निता शिरतोडे, मेघा भंडलकर, नंदा जाधव आदी कार्यकर्ते व तरुण वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments