सोमेश्वरनगर | विजय लकडे.
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. बारामती तालुक्यातील वडगाव पंचायत समिती गणात सध्या चर्चेत असलेले नाव म्हणजे सोमेश्वरचे सामाजिक कार्यकर्ते सुखदेव शिंदे.
शिंदे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्याचा वसा जपत ग्रामीण भागात लोकसेवेची मजबूत पायाभरणी केली आहे. कोणत्याही स्वार्थाशिवाय समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी राबविलेले विविध उपक्रम:
रक्तदान, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिरे
कोविड काळात गरजू कुटुंबांना किराणा किट, मास्क व औषधांचे वाटप
आर. सैनिक अल्बमच्या थर्टी गोळ्या व मास्कचे दीड हजार कुटुंबांना वितरण
शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, चित्रकला स्पर्धा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम
कोरोना काळात उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना “कोविड योद्धा” सन्मान
५०० हून अधिक नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
श्री सोमेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान, फळ-फराळ वाटप, भक्तांसाठी रांगेचे नियोजन
भाविक भक्तांसाठी तीर्थयात्रा व दर्शनाचे आयोजन .
गेल्या दहा वर्षांपासून चालू असलेल्या या सेवाभावी उपक्रमांमुळे सुखदेव शिंदे यांनी वडगाव गणातील जनतेच्या मनात विश्वास व आपुलकी निर्माण केली आहे.
थोपटेवाडी, कोर्हाळे बु., वडगाव निंबाळकर, चोपडज, वाकी, मगरवाडी, करंजे, चौधरवाडी अशा गावांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण असून स्थानिक पातळीवर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. ग्रामस्थांकडून उपमुख्यमंत्री अजित दादांकडे त्यांच्या उमेदवारी बाबत मागणी केली जाणार आहे.
“जनतेसाठी सदैव उपलब्ध असणारा आणि समाजसेवेला वाहून घेतलेला चेहरा म्हणज सुखदेव शिंदे,”असा सूर सध्या वडगाव गणातील ग्रामस्थांमध्ये उमटताना दिसत आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 9860496161


0 Comments