Supa |नाजरे सुपे विकास सोसायटीची 105 वी सर्वसाधारण वार्षिक सभा यशस्वी ‌

 

                             पुरंदर रिपोर्टर Live 

सुपे | प्रतिनिधी

                     नाजरे सुपे विकास सोसायटीची १०५ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता संस्था कार्यालयात चेअरमन  सतिश कापरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सचिव हनीफभाई सय्यद यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. संस्थेची संपत्तीक स्थिती पुढीलप्रमाणे मांडण्यात आली :

        •       भाग भांडवल ८५ लाख ५० हजार
निधी:3 लाख 90 हजार
कर्ज वाटप : 5 कोटी 60 लाख
गुंतवणूक : 80 लाख 93 हजार
वसुली व बँक पातळी : कायम 100%

गेल्या 15 वर्षांपासून संस्था 12% लाभांश देणारी आदर्श संस्था म्हणून ओळख निर्माण करत आहे.


यावेळी मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मा. मंगेश घोणे साहेब यांचा सन्मान चेअरमन, संचालक व सभासदांच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमास विनायकतात्या कापरे, राहुल कापरे, सुनील कापरे, राजेंद्र कदम, नवनाथ सर्जे, संभाजी कापरे, दत्तात्रय कदम, सोमेश्वर कारखान्याचे संचालक शांताराम कापरे, प्रभाकर कापरे यांच्यासह अनेक मान्यवर, आजी-माजी पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभासदांनी संस्थेच्या उत्कृष्ठ कामकाजाचे विशेष कौतुक केले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली. शेवटी चेअरमन व संचालक मंडळाने उपस्थित सभासदांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments