Baramati | बारामतीतील विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी उपक्रम .. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 लाख 21 हजारांची मदत सरकारकडे सुपूर्त..!



बारामती: प्रतिनिधी 

                           बारामतीतील विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी १० लाख वर्गणी जमा केली आणि ती सुपूर्त देखील केली. बारामतीतील ज्ञानसागर गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी घरोघरी जाऊन मदत गोळा केली आणि ती पूरग्रस्तांसाठी सरकारच्या हवाली केलीय. 




दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना 10 लाख 21 हजारांची आर्थिक मदत केली आहे. या मदतीमुळेअनेक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळाले आहे.







पूरग्रस्त परिस्थितीमुळे हजारो शेतकरी हतबल झाले होते. यावेळी शिवार फाऊंडेशनला 5 लाख रुपयांचे आर्थिक पाठबळ दिले आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 5 लाख 21 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. यामुळे महापुराच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना भर दिवाळीच्या तोंडावर ज्ञानसागर गुरुकुलच्या माध्यमातून 10 लाख 21 हजार रुपयांची आर्थिक मदत करुन विद्यार्थांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. सोबतच बळीराज्याच्या पाठीशी आम्ही सगळे सोबतआहोत असा एक आदर्श महाराष्ट्रा समोर ठेवला आहे

Post a Comment

0 Comments