Purandar | निरा नदी प्रदूषण थांबवण्याची संकल्पना! राजेंद्र बरकडे व बंधूंचा पर्यावरणपूरक आदर्श उपक्रम समाजासमोर आदर्श.

 


पुरंदर : प्रतिनिधी

                                            पुणे जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष व ‘वाघर’ मराठी चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक राजेंद्र बरकडे आणि त्यांचे बंधू दादासाहेब बरकडे यांनी आपल्या आई-वडिलांच्या अस्थी विसर्जनावेळी एक वेगळा आणि प्रेरणादायी मार्ग अवलंबला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून त्यांनी अस्थी व राख नदीत न टाकता त्याच अस्थींचा उपयोग हरित उपक्रमासाठी करण्याचा निर्णय घेतला.



बरकडे बंधूंनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ प्रत्येकी एक झाड लावून त्या झाडांच्या बुंध्याशी अस्थी व राख ठेवली, आणि ते झाड वाढवण्याचा संकल्प केला. या उपक्रमाद्वारे त्यांनी केवळ पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला नाही, तर समाजात पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची नवी दिशा दिली आहे.



“निरा नदीचे प्रदूषण थांबावे, कारण या नदीचे पाणी अनेक गावे पीत आहेत आणि परिसरात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नदी स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे,” असे मत बरकडे कुटुंबीयांनी व्यक्त केले.


या अभिनव उपक्रमाचे मा. आमदार विजयराव मोरे यांनी कौतुक करताना म्हटले,

“बरकडे कुटुंबाने दाखवलेला मार्ग अनुकरणीय आहे. पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार आणि वृक्षलागवड हे दोन्ही समाजासाठी प्रेरणादायी आहेत. प्रत्येकाने अशा संवेदनशील विचारांची अंमलबजावणी करावी.”बरकडे कुटुंबाचा हा छोटासा पण अर्थपूर्ण प्रयत्न आज संपूर्ण समाजासाठी एक हरित आणि संवेदनशील संदेश ठरत आहे.

“बरकडे कुटुंबाने दा आणि वृक्षलागवड हे दोन्ही समाजासाठी प्रेरणादायी आहेत. प्रत्येकाने अशा संवेदनशील विचारांची अंमलबजावणी करावी.”बरकडे कुटुंबाचा हा छोटासा पण अर्थपूर्ण प्रयत्न आज संपूर्ण समाजासाठी एक हरित आणि संवेदनशील संदेश ठरत आहे. 


Post a Comment

0 Comments