Purandar | पुरंदर तालुक्यात निवडणुकीचा जंगी माहोल ; निरा-शिवतक्रार कोळविहिरे गटात उमेदवारीसाठी चुरस वाढली ! निकिता योगेश ननवरे इच्छुक..!




 निरा : विजय लकडे 

                     महाराष्ट्रातील “मिनी विधानसभा” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे आता पुरंदर तालुक्यात जोरात वाहू लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून, सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही आघाड्यांवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. यामुळे या निवडणुका यंदा विशेष चुरशीच्या होणार असल्याचे संकेत स्पष्टपणे दिसत आहेत.

                  राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट, शरद पवार गट),काँग्रेस, भाजप, शिवसेना (शिंदे गट, उद्धव ठाकरे गट), आरपीआय आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांसह इतर अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकीत ताकदीने उतरायची तयारी केली आहे. स्थानिक स्तरावर गटबाजी आणि राजकीय समीकरणांमध्ये नवे फेरबदल होत असून प्रत्येक गटात उमेदवार ठरवण्यासाठी चढाओढ सुरू आहे. सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवाराचा शोध देखील सुरू केला आहे ‌

                              दरम्यान, निरा-शिवतक्रार कोळविहीरे जिल्हा परिषद गट यंदा नागरिक मागास प्रवर्ग महिला (ओबीसी) या आरक्षणाखाली आरक्षित झाल्याने, उमेदवारांच्या चर्चेला विशेष ऊत आला आहे. या गटात निरा शिवतक्रार, कोळविहिरे, राख, गुळूंचे, कर्नलवाडी, वाल्हे, जवळार्जुन, जेजुरी ग्रामीण आणि पिंपरे या मोठ्या व मातब्बर पुढार्‍यांच्या गावांचा समावेश असल्याने या गटाचे राजकीय महत्त्व लक्षणीय आहे. तालुक्यातील अनेक दिग्गजांनी या गटाचे प्रतिनिधित्व केले आहे. 

                     या पार्श्वभूमीवर निरा येथील राष्ट्रवादी (अजित पवार गट) युवक कार्यकर्ते योगेश ननवरे यांनी आपल्या पत्नी निकिता योगेश ननवरे यांच्या उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्यानंतर या गटातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून योगेश ननवरे पुरंदर तालुक्यात सक्रिय आहेत. पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.


सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. मंदिरांच्या जिर्णोद्धार व सुशोभीकरणात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. कानिफनाथ गडाच्या सुशोभीकरणासाठी आणि अन्नदान उपक्रमात त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला आहे.


कोविड काळात अनेक गरजू नागरिकांना अन्नधान्य कीट वाटप करून सामाजिक जबाबदारी पार पाडली. शाळेतील मुलांना शैक्षणिक मदत आणि खाऊ वाटप, तरुणांना प्रेरणा देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांत सक्रिय सहभाग, तसेच बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे—या सर्व क्षेत्रांत त्यांनी आपली उपस्थिती ठसवली आहे.

                   गेल्या  काही वर्षापासून निष्ठावंत पक्षकार्यानंतर, पुरंदर आणि बारामती तालुक्यातील विस्तृत मित्रपरिवारामुळे निकिता ननवरे यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे या गटातील राजकीय समीकरणे नव्याने घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


राजकीय पंडितांच्या मते, निरा-शिवतक्रार गटातील लढत यंदा अत्यंत चुरशीची होणार आहे. अनुभवी दिग्गज आणि नव्या चेहऱ्यांमधील ही स्पर्धा पुरंदर तालुक्याच्या राजकीय दिशेला नव्या स्वरूपात आकार देईल, असे चित्र सध्या दिसत आहे.


बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-९८६०४९६१६१ 


Post a Comment

0 Comments