पुरंदर रिपोर्टर Live
निरा : प्रतिनिधी.
संपूर्ण पुणे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला असताना पुरंदर तालुक्यात देखील सर्वच पक्षांनी या निवडणुकीमध्ये मोठ्या रणनीतीने उतरण्याची तयारी केली आहे.
पंचायत समिती पुरंदर, निरा शिवतक्रार गण मध्ये अनुसूचित जाती मधून प्रशांत अशोक पाटोळे अनुसूचित जाती जमाती पुरंदर तालुका पूर्व अध्यक्ष यांची पत्नी स्शिवानी प्रशांत पाटोळे या भारतीय जनता पक्षाच्या वतीने निरा शिवतक्रार - वाल्हा गणा मधून इच्छुक उमेदवार आहेत* प्रशांत पाटोळे हे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मधील एक समजले जातात त्यांनी भारतीय जनता पक्ष मध्ये विविध पदांवर काम केले आहे त्याचप्रमाणे ते लहुजी शक्ती सेना या सामाजिक संघटनेचे ही युवक अध्यक्ष म्हणून पुरंदर तालुक्यात काम पाहिले आहे आणि या माध्यमातील त्यांनी वंचित दुर्बल घटकांना न्याय द्यायचे काम त्यांनी केले आहे प्रशांत पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली निरा शिवतक्रार शहरामध्ये मोठ्या उत्साहात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत असते, तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ते आपले सामाजिक काम करत आहेत. घरचा कोणाची राजकीय वारसा नसतानाही त्यांनी आपल्या कार्यातून भारतातील सर्वात मोठ्या पक्षा मधे चांगलीच पकड ठेवली आहे.
त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पंचायत समिती पुरंदर, निरा शिवतक्रार - वाल्हा गणामध्ये उमेदवारी जाहीर करावी अशी त्यांची रास्त मागणी आहे.
तसेच अनुसूचित जाती मधे 59 जातींचा समावेश आहे त्या मधे काही बोटावर मोजण्या इतक्याच जाती आरक्षणाचा लाभ घेत असतात व इतर जाती राजकीय, आर्थिक दृष्ट्या दुर्लक्षित राहिल्या आहेत त्या मधे प्रामुख्याने मातंग समाज ही येतो. तसेच मातंग समाज कायम आपला मोठा भाऊ मधून बौद्ध समाजाकडे पहिले जाते त्या मुळे यावेळेस बौद्ध समाजाने मातंग समाजाला पाठिंबा देऊन ही पंचायत समिती ची जागा बिनविरोध व्हावी ही त्यांची इच्छा आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- 9860496161



0 Comments