पुरंदर रिपोर्टर Live
पुणे: प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ३ ने केवळ ४८ तासांच्या आतप्रियकराच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणत सर्व आरोपींना अटक केली आहे. चाकण जवळील कडाचीवाडी येथील ठाकरवस्ती परिसरात २ ऑक्टोबर रोजी मृतदेह सापडल्यानेपरिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपासाची गती वाढवत आरोपींना गाठले. मृत व्यक्तीचे नावमुकेश कुमार (वय २४ ) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश कुमार आणि आरती कुमारी बिजलाउराम उराव (वय २३ ) यांचेमागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते दोघे एकत्र राहात होते. मात्र, या संबंधांत वारंवार वाद व्हायचे. मुकेश हा आरतीवर किरकोळ कारणावरून हात उचलत असे. सततच्या या मारहाणीला कंटाळूनआरतीच्या मनात राग आणि सूडाची भावना निर्माण झाली. शेवटी तिने आपल्या भावाला आणि आणखीएका साथीदाराला मदतीसाठी बोलावले.
२ ऑक्टोबर रोजी या तिघांनी मिळून मुकेशवर प्राणघातक हल्ला केला. आरती आणि तिच्यासाथीदारांनी धारदार हत्याराने त्याच्या डोक्यावर व तोंडावर वार केले. वारंवार झालेल्या हल्ल्यामुळेमुकेशचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह एकाब्लँकेटमध्ये गुंडाळला आणि तो चाकणजवळील निर्जन ठिकाणी फेकून दिला.
मृतदेह सापडताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्यायुनिट 3 ने स्वतंत्र तपास पथक तयार केले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असताकाही संशयास्पद हालचाली लक्षात आल्या. त्याचबरोबर, मुकेशसोबत राहत असलेल्या काही व्यक्तीअचानक खोली सोडून गायब झाल्या असल्याचे समोर आले. या धाग्यांवरून पोलिसांनी तपासाची दिशाठरवली.
तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी संभाजीनगर येथे लपून बसले आहेत. पोलिसांनीतातडीने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आकाशबिजलाउराम उराव
(वय २१ ), आरती कुमारी बिजलाउराम उराव (वय २३ ) आणि बालमुनी कुमारी रामचंद्रउराव (वय २१ ) अशी आहेत.
या तिन्ही आरोपींवर चाकण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडपोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने ही कारवाई केली आहे. वरिष्ठ पोलीसनिरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस अंमलदारराजाराम लोणकर, योगेश आढारी, राम मेरगळ, सागर जैनक, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, समीर काळे आणि शेखर खराडे यांनी तपास पूर्ण करून आरोपींना अटक केली.


0 Comments