जेजुरी : प्रतिनिधी
दि. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी भाऊबीज निमित्ताने जेजुरी येथील पी एम पी एल स्टॉप वर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. गर्दीमध्ये महिला व मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. या गर्दीत मूळ बीड जिल्ह्याचे परंतु सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले बालाजी बापूराव इंगोले व त्यांची पत्नी सारिका इंगोले जेजुरी येथून हडपसरला गेले. प्रवासादरम्यान आपली बॅग जेजुरी स्थानकावर विसरले. हडपसर मध्ये गेल्यानंतर आपली बॅग जेजुरी येथेच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्या बॅगेमध्ये मोबाईल, पर्स, रोख रक्कम, बाळाचे कपडे, डब्बा, देवाची मूर्ती तसेच लहान बाळाचे खाऊ, याचबरोबर काही मौल्यवान वस्तू होत्या. बॅग हरवल्याचे लक्षात येताच इंगोले दाम्पत्यांनी तत्काळ बसचालक व वाहकाशी संपर्क साधला. बस चालकाने त्यानंतर लगेच पीएमपीएमएल जेजुरी स्थानकाचे कंट्रोलर धीरण पवार यांच्याशी संपर्क साधून बॅग विसरल्याचे सांगितले .
धीरण पवार यांनी प्रामाणिकपणा आणि जबाबदारीचे उत्तम उदाहरण दाखवत तात्काळ कार्यवाही करून ती बॅग जेजुरीच्या पी एम पी एल स्थानकावर शोधून काढली. सर्व वस्तू सुरक्षित अवस्थेत परत इंगोले दाम्पत्यांना सुपूर्द करण्यात आल्या.
धीरण पवार यांच्या या प्रामाणिक आणि संवेदनशील वर्तनाबद्दल प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.प्रामाणिक सेवेमुळे जेजुरी स्थानकावरील पीएमपीएमएल कर्मचाऱ्याने आदर्श घालून दिला आहे.



0 Comments