निरा : प्रतिनिधी
पिसुर्टी (ता. पुरंदर) – अंजना महादेव बरकडे (वय ६५) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या आजाराने त्रस्त होत्या आणि उपचार सुरू असतानाच पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनाने बरकडे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्या पुणे जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष राजेंद्र बरकडे यांच्या मातोश्री तसेच आदर्श सरपंच सविता बरकडे यांच्या त्या सासूबाई होत.
अंत्यविधी आज सकाळी साडेनऊ वाजता पिसुरटी येथे होणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.



0 Comments