निरा : प्रतिनिधी
निरा-कोळविहीरे जिल्हा परिषद गटासाठी २०२५ च्या निवडणुकीत ओबीसी महिला प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले असून, संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या या गटाचे प्रतिनिधित्व अनेक दिग्गजांनी केले आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, राष्ट्रवादी शरद पवार गट याबरोबरच इतर पक्षांनी देखील या निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे या गटातून शिवसेने कडून पुरंदरच्या माजी सभापती सुजाता वसंतराव दगडे या इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत.
सुजाता दगडे यांनी पुरंदरचे आ.विजय शिवतारे (माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.
राजकीय पार्श्वभूमी.
सुजाता दगडे या दोन कार्यकाळ पंचायत समिती पुरंदरच्या सभापती राहिल्या असून, त्या जिल्हा परिषद पुणे येथील महिला व बालविकास, कृषी, पशुसंवर्धन आणि दुग्धशाळा समितीवरही सदस्य राहिल्या आहेत. तसेच त्या कृषी उत्पन्न बाजार समिती, निरा यांच्या माजी संचालिका आणि ग्रामपंचायत निरा-शिवतक्रारच्या माजी सरपंचही राहिल्या आहेत.
त्यांचे पती डॉ. वसंतराव दगडे हे श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन असून, ग्रामपंचायत सदस्य म्हणून २५ वर्ष काम केले आहे. तसेच सासरे कै. रामराव तुकाराम दगडे हे ११ वर्ष ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहिले आहेत.
सुजाता दगडे यांनी आपल्या सभापती पदाच्या कारकिर्दीत शेतकरी, कामगार, महिला, वृद्ध, निराधार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. “शासकीय योजना आणि निधी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हे माझे कर्तव्य आहे,” असे त्या म्हणाल्या.
गावोगावी असलेला जनसंपर्क, विकासाचा अनुभव आणि जनतेचा विश्वास या बळावर त्या या निवडणुकीत विजयी होण्याचा आत्मविश्वास व्यक्त करत आहेत.



0 Comments