Purandar | पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेचा २७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा



निरा : प्रतिनिधी

                          पुरंदर तालुक्यातील अग्रगण्य वित्तीय संस्थांपैकी एक असलेल्या पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेच्या निरा शाखेचा २७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

                       या सोहळ्याला संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती आनंदी काकी जगताप, उपाध्यक्ष कृष्णा शेट्टी, तसेच सर्व संचालक मंडळ , सर्व संस्थेचे शाखाधिकारी उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत पुढील वाटचालीचा संकल्प करण्यात आला.



या प्रसंगी निरा, वाल्हे, जेऊर, मांडकी, पिंपरे, पाडेगाव, लोणंद, निंबूत, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी, गुळूंचे आणि कर्नलवाडी, राख, नावळी, जवळार्जुन या विवीध गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटी पदाधिकारी , संस्था सभासद व पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


संस्थेकडे आजघडीला ५५० कोटी रुपयांच्या ठेवी असून संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या या पतसंस्थेच्या १३ स्वमालकीच्या शाखा आहेत.



स्वर्गीय चंदूकाका जगताप यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचे रूपांतर आज वटवृक्षात झाले असून, माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची घोडदौड यशस्वीपणे सुरू आहे.

                           या कार्यक्रमात सरव्यवस्थापक अनिल उरवणे, व्यवस्थापक सतीश शिंदे, विशेष वसुली अधिकारी सतीश पवार, शाखाधिकारी बापू दगडे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

सोहळ्याच्या शेवटी संस्थेच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या सर्व सभासद व अधिकारी यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments