पुरंदर रिपोर्टर लाईव्ह.
निरा. प्रतिनिधी.
बारामती. निंबूत( कुरण वस्ती) येथील रवींद्र लक्ष्मणराव काकडे वय ५१ रा. निंबूत (कुरण वस्ती) आज राहत्या घरी दुःखद निधन झाले. गेले काही महिने आजाराने घरीच अंथरुणाला खिळून होते. आज सकाळी त्यांची राहत्या घरी प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पाठीमागे आई, भाऊ, बहिण, पत्नी (कविता)व ऋतुराज व भाग्यश्री अशी दोन मुले आहेत.
सर्वांशी मिळून मिसळून, हसून खेळून वागणारे अशी त्यांची निंबूत व निरा परिसरात ख्याती होती. अंत्यविधी सायंकाळी सहा वाजता निरा डावा कालवा कॅनॉल (पूल)शेजारी स्मशानभूमीमध्ये होणार आहे.

0 Comments