निरा : प्रतिनिधी
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, या “मिनी विधानसभा” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातही चुरस पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, काँग्रेस आदी पक्षांनी उमेदवारांच्या चाचपणीस सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) मध्येही उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर कोळविहिरे जिल्हा परिषद गटातून सारिका गोपाळ बंडगर यांचे नाव प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत आले आहे. त्यांचे पती गोपाळ बंडगर हे माजी मंत्री व आमदार विजयबापू शिवतारे यांचे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. तरुण वयातच त्यांनी शिवसेनेत सक्रिय काम करत स्थानिक पातळीवर मजबूत संघटन उभारले आहे.
राजकीय पार्श्वभूमी:
गोपाळ बंडगर यांचे वडील बाबुराव बंडगर हे दोन टर्म ग्रामपंचायत सदस्य राहिले आहेत, तर त्यांचे बंधू केशव बंडगर हे 2008 पासून नीरा शहराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. वहिनी सौ. वैशाली बंडगर यांनीही नीरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची जबाबदारी निभावली आहे.
व्यवसाय आणि सामाजिक कार्य:
बंडगर कुटुंब पारंपरिक शेती, दुग्धव्यवसाय आणि डाळिंब बागायतीत कार्यरत असून, गोपाळ बंडगर यांनी 2011 मध्ये “श्रीकृष्णा ट्रान्सपोर्ट सर्व्हिस ऑल इंडिया” या नावाने ट्रान्सपोर्ट व्यवसायाची सुरुवात केली. आज त्यांच्या या उपक्रमाची महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, गोवा, राजस्थान, तामिळनाडू, बेंगळुरू, चेन्नई या राज्यांमध्ये ODC स्पेशालिस्ट म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील निर्मल वारीत सात वर्षांपासून सेवा कार्य, बंडगरवस्तीतील श्रीदत्त मंदिर व हनुमान मंदिराची स्थापना, तसेच आई तुळजा भवानी प्रतिष्ठान, शिवतक्रार–नीरा मार्फत महिलांसाठी साडीवाटप, धार्मिक सहली, स्पर्धा आणि महाप्रसाद यांसारख्या उपक्रमांचे आयोजन केले आहे.
गोपाळ बंडगर हे आमदार विजयबापू शिवतारे यांच्या संपर्कात राहून नागरिकांच्या विविध समस्यांवर पाठपुरावा करतात. त्यांच्या प्रयत्नांतून नीरा परिसरात रस्ते, पूल, वीज आणि अन्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. दरवर्षी आमदार विजयबापू यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळांमध्ये व्याख्याने, स्पर्धा, तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे कार्यक्रम घेतले जातात.
या सर्व कार्यामुळे कोळविहिरे जिल्हा परिषद गटात सारिका गोपाळ बंडगर यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा सहभाग पुरंदर तालुक्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा ठरू शकतो.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- 9860496161



0 Comments