Baramati | निंबूत पंचायत समिती गणात राष्ट्रीय समाज पक्षाची उमेदवारी. जालिंदर लकडेंची उमेदवारी जाहीर.?

 

सोमेश्वरनगर | प्रतिनिधी.  

                निंबूत-काबळेश्वर जिल्हा परिषद गटातील निंबूत पंचायत समिती गणामध्ये आता राष्ट्रीय समाज पक्षानेही आपली दावेदारी सादर केली आहे. पक्षाचे जुने, निष्ठावान व सक्रिय कार्यकर्ते जालिंदर लकडे यांनी या गणातून निवडणूक लढवण्याची दावेदारी केली असून, त्यांच्या उमेदवारीबाबत परिसरात चर्चा सुरू झाली आहे.



जालिंदर लकडे हे पक्ष स्थापनेपासूनच कार्यरत असून, त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. जानकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व रोग निदान शिबिर, वृक्षारोपण मोहिमा, तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती, अहिल्यादेवी होळकर जयंती, उमाजी नाईक जयंती, महात्मा फुले जयंती अशा सामाजिक कार्यक्रमांत त्यांच्या सक्रिय सहभागामुळे त्यांची ओळख एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून झाली आहे.



पक्षाच्या वर्धापन दिनापासून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सातत्याने सहभाग घेतला असून, बारामती तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.



ऊपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असलेले जालिंदर लकडे हे तरुणांमध्ये लोकप्रिय चेहरा बनले असून, आगामी पंचायत समिती निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

Post a Comment

0 Comments