Baramati | ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर,वडगाव निंबाळकर पोलीस व सोमेश्वर कारखान्याचा पुढाकार.

 


सोमेश्वरनगर :  प्रतिनिधी

                       श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली आणि बैलगाड्यांना रिफ्लेक्टर लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला.



“सुरक्षित वाहतूक – सुरक्षित चालक” या घोषवाक्याखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेचा उद्देश रात्रीच्या वेळी अपघात टाळणे आणि दृश्यमानता वाढवणे हा आहे.



या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, सोमेश्वरचे संचालक लक्ष्मण गोफणे व बापूसाहेब गायकवाड यांच्या हस्ते झाले. या वेळी अनेक वाहन चालक, ऊसतोड मजूर व ग्रामस्थ उपस्थित होते.



पोलीसांनी वाहनचालकांना वेग मर्यादा पाळणे, नशा टाळणे व रात्री दिवे सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. रिप्लेक्टरमुळे अपघात कमी होऊन जीवितहानी टाळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला .

Post a Comment

0 Comments